परभणी (CM Ladki Bahin Yojana) : राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे लेक लाडकी आणि (CM Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजना सुरु करण्यात आल्या असून, लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे बँक खाते जवळच्या (Post office) पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडता येणार आहे, असे डाक अधीक्षक मोहमद कदीर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या (CM Ladki Bahin Yojana) दोन्ही योजनांचा लाभ मिळण्याची कार्यपद्धती शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असून आर्थिक लाभ डिबीटी पध्दतीने देण्यात येणार आहे. यासाठी बचत खाते उघडणे आवश्यक आहे. (Post office) बचत खाते जवळच्या गाव, खेड्यातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येणार आहे. लेक लाडकी योजनेमध्ये लाभार्थी मुलींच्या खात्यामध्ये निर्देशित केलेल्या टप्प्या-टप्प्याने वयाच्या १८ वर्षापर्यंत एकूण १ लाख १ हजार रुपये इतकी रक्कम जमा होणार आहे.
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण (CM Ladki Bahin Yojana) या योजने अंतर्गत महिलांच्या स्वतःच्या बचत खात्यात दर महिन्याला १ हजार ५०० रुपये इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे. लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक असणारे खाते पोस्ट ऑफिसमध्ये काढण्यासाठी मुलीच्या जन्माचा दाखला, मुलीचे आधार कार्ड, आईचे पॅन कार्ड (सध्या पॅन कार्ड नसल्यास फॉर्म ६०), आईचे आधार कार्ड आणि मुलगी व आई यांचा संयुक्त फोटो या कागदपत्रांची आवश्यक आहे.परभणी (Post office) डाक विभागांतर्गत येणार्या ३८८ टपाल कार्यालयांमध्ये खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन (Post office) डाक अधिक्षक मोहम्मद खदीर यांनी केले आहे.