बुलडाणा (CM Ladki Bahin Yojana) : “रक्षाबंधनाची ओवाळणी भेट भाऊ माझ्या बॅक खात्यात जमा झाली”. (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री भाऊप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला आणि केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांना प्रत्यक्ष राखी बांधून मुख्यमंत्री (CM Ladki Bahin Yojana) “माझी लाडकी बहीण” योजनेचे स्वागत केले.
जल्लोषात मानले सरकारचे आभार!
महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या सरकारने (CM Ladki Bahin Yojana) “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आहे. या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते, रक्षाबंधनाच्या सणापूर्वीच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री भावाप्रती आदरव्यक्त करत एकनाथराव शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रतिमेला राखी बांधून ओवाळणी करून कृतज्ञता व्यक्त केली.
मेहकर येथे झालेल्या कृतज्ञता सोहळ्याला केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) उपस्थित होते, यावेळी महिलांनी प्रतापराव जाधव यांनाही राखी बांधून सरकारप्रती आभार व्यक्त केले. या कृतज्ञता सोहळ्याला प्रतापरावांच्या सौ. नम्रताताई वायाळ, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, वैशालीताई सावजी, अक्काताई गायकवाड यांच्यासह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.