परभणी/गंगाखेड (CM Ladki Bahin Yojana) : तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील (Revenue Department) महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने नागरिकांची विविध कामे खोळंबली आहे. (Revenue Department) महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासंबंधी जून महिन्यात शासनाकडे निवेदन देऊन सुद्धा याची दखल घेतली नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य (Revenue Employees Association) महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने दि. १० जुलै रोजी काळ्या फिती लावून काम केले. दि. ११ जुलै रोजी निदर्शने केली. दि.१२ जुलै रोजी लेखनी बंद आंदोलन केले.
वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून ही या आंदोलनाची कसल्याच प्रकारे दखल घेण्यात आली नसल्याने गंगाखेड तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने व मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असे (Revenue Employees Association) महसूल कर्मचारी संघटनेचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गणेश सोडगीर यांनी सांगीतल्याने शैक्षणिक कामासाठी लागणारे जातीचे प्रमाणपत्र, (CM Ladki Bahin Yojana) लाडकी बहिण योजनेसाठी लागणाऱ्या शिधा पत्रिकेत नाव लावणे, नाव कमी करणेसाठीचे शपथपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आदी विविध कागदपत्रे काढण्यासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना संप मिटण्याची वाट पाहत दिवस दिवस तहसील कार्यालयासमोर थांबून कामे न करताच परत जावे लागत आहे. यामध्ये ग्रामीण भागातून विविध कागदपत्रे काढण्यासाठी शहरात येणाऱ्या महिला भगिंनीची बेमुदत संपामुळे चांगलीच फजिती होत असल्याचे व आल्या हाताने घरी परतावे लागत असल्याचे चित्र (Tehsil Office) तहसील कार्यालय परिसरात पहावयास मिळत आहे.