मुंबई (CM Ladki bahin yojana) : महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भाजपचे आमदार तेजचंद सावरकर (MLA Tejchand Savarkar) यांनी सत्ताधारी महायुती आघाडीची प्रमुख योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ यासंदर्भात असे विधान केले आहे. यानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकार काँग्रेसच्या निशाण्यावर आले आहे. भाजपचे आमदार तेजचंद सावरकर (MLA Tejchand Savarkar) म्हणाले की, लाडकी बहीण योजना (CM Ladki bahin yojana) ही महिलांची मते मिळविण्याचा जुगाड आहे. यानंतर काँग्रेसने महायुती सरकारला घेरले असून, भाजप आमदाराच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे खरे हेतू उघड होत असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले भाजपचे आमदार सावरकर?
महाराष्ट्रातील कामठी मतदारसंघातील जाहीर सभेत भाजपचे आमदार सावरकर (MLA Tejchand Savarkar) म्हणाले की, भाजपला मते मिळवून देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही जुगाड रणनीती आणली आहे. जेणेकरून निवडणुकीच्या काळात आमच्या (CM Ladki bahin yojana) लाडक्या बहिणी आम्हाला मतदान करतील. मला प्रामाणिकपणे सांगा, निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणी भाजपला मतदान करतील, त्यानंतर आम्ही ही योजना का बर सुरु ठेवायची?
“मत मिळवण्यातच आमचे हित”
भाजपचे आमदार सावरकर (MLA Tejchand Savarkar) पुढे म्हणाले की, “योजनेच्या उद्देशाबाबत इतरांनी लोकांची दिशाभूल केली असेल, परंतु आमच्या सरकारने जे आश्वासन दिले ते पूर्ण केले. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि आमची इच्छा फक्त मते मिळवणे आहे.”
महायुती सरकारचा धूर्तपणा समोर आला
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सावरकरांच्या (MLA Tejchand Savarkar) वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत भाषणाची क्लिप शेअर करत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीवर टीका केली. वडेट्टीवार म्हणाले की, “अखेर महायुती सरकारचा धूर्तपणा उघड झाला आहे. महायुतीचे नेते खोटे बोलत असल्याची कबुली या भाजप आमदाराने दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CM Ladki bahin yojana) महिलांच्या फायद्यासाठी नाही, तर मते मिळवण्यासाठी केली आहे. महायुतीला मतांच्या कमतरतेचा सामना करावा लागल्याने भाजप आमदाराने ज्याला ‘जुगाड’ असे वर्णन केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना
विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) महायुती सरकारने 21 ते 65 वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांसाठी ही (CM Ladki bahin yojana) योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सरकार महिलांना दरमहा 1500 रुपये देते. या योजनेचा लाभ फक्त त्या महिलांनाच मिळणार आहे, ज्यांची वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 2.5 लाख रुपये आहे.