लाडक्या बहीण योजना
हिंगोली (CM Ladki Bahin Yojana) : विधानसभा मतदार संघातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत (CM Ladki Bahin Yojana) अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्कृष्ट रित्या काम केल्या जाता आहे. या अनुषंंगाने आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी ११ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा करून १६ सप्टेंबर रोजी बळसोंड भागातील यमुना निवास या ठिकाणी गौरव केल्या जाणार आहे.
१६ सप्टेंबर रोजी आ. तान्हाजी मुटकुळे यांचे यमुना निवास बळसोंड येथे होणार कार्यक्रम
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत (CM Ladki Bahin Yojana) अनेक लाडक्या बहिणींनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्या लाडक्या बहिणींना आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांच्या पाठपुराव्यातुन तीन हजार रुपयांची आर्थिक मदत अर्थात दिवाळी भेट बँकेच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत ऑॅनलाईन अर्ज दाखल करणे आता बंद झाले असले तरी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातुन लाडक्या बहिणीचे अर्ज ऑॅफलाईन रित्या घेतले जात आहेत.
त्यामुळे हिंगोली मतदार संघातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत (CM Ladki Bahin Yojana) ज्या अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतीस यांनी उत्कृष्ट काम केले त्यांना ५१ हजार रुपये बक्षीस व प्रोत्साहन पर उत्कृष्ट काम करणार्या ११ महिलांना प्रत्येकी अकरा हजार रुपये बक्षीस आ. तान्हाजी मुटकुळे यांच्याकडून देण्यात येणार आहे. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांचे यमुना निवासस्थान , बळसोंड या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणार्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा गौरव करण्यात येणार आहे, असे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले.