सिन्नर तालुक्यातील एकही लाभार्थी वंचित राहू नये : सीमंतीनी कोकाटे
सिन्नर (CM ladki Bahin Yojana) : राज्यशासनाने महिलांच्या उन्नतीसाठी सुरू केलेल्या (CM ladki Bahin Yojana) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून’ सिन्नर तालुक्यातील एकही लाभार्थी वंचित राहू नये म्हणून तहसीलदार व बँकांनी सहकार्य करावे, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी (Zilla Parishad) जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटून केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CM ladki Bahin Yojana) राज्यशासनाने या महिन्यापासून सुरू केली आहे. त्यासाठी लाभार्थी महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. मात्र या अर्जासोबत जी कागदपत्रे सादर करायची आहेत, ती मुख्यतः तहसील कार्यालयाशी संबंधित आहेत. अनेक महिलांचे रेशनकार्ड मध्ये नाव नाही. ९५ टक्के महिलांकडे उत्पन्न दाखला नाही. काहींकडे जन्म दाखला उपलब्ध नाही. त्यामुळे महिला (Ration card) रेशनकार्डमध्ये नाव घालण्यासाठी, उत्पन्न दाखला मिळविण्यासाठी व जन्मदाखला नसल्याने अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसीलला येतील.
अशा वेळी त्यांच्यासाठी एक खिडकी योजने सारखा स्वतंत्र विभाग सुरू करून ज्या दिवशी लाभार्थ्यांचे अर्ज येतील, त्याच दिवशी त्यांना संबंधित दाखले देण्यासाठी तहसील विभागास सूचना कराव्यात व ही कागदपत्रे लाभार्थी महिलेस वेळेत मिळाली नाही तर त्याची जबाबदारी तहसील विभागावर निश्चित करावी, अशी मागणी सीमंतिनी कोकाटे यांनी उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांच्याकडे केली. अंगणवाडी कर्मचारी अर्ज भरून देण्याचे काम करणार आहेत. महिला व बालविकास विभागाने त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून या (CM ladki Bahin Yojana) योजनेची जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ज्या महिलांकडे बँक पासबुक उपलब्ध नसेल त्यांना ते बँकांनी तात्काळ उपलब्ध करून द्यावे, केवायसीसाठी बँक, सेतू व तहसील विभाग यांना सहकार्य करण्यासाठी सूचना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
महिला सक्षमीकरणासाठी सर्वांनी सहकार्य करावे
या योजनेचे अर्ज ऍपद्वारे ऑनलाईनरित्या भरायचा आहे. त्यामुळे सेतू केंद्रचालक, तेथील कर्मचारी व गावातील तरुण वर्गाने स्वयंस्फूर्तीने महिलांना सहकार्य करावे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वच घटक मदत करतील अशी खात्री वाटते.
– सीमंतिनी कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्या