हिंगोली (CM Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता (CM Ladki Bahin Yojana) अनेक महिलांच्या बँक खात्यावर रक्कम आली आहे. तर बर्याच महिलांचे ई-केवासी नसल्याने अनेक महिला बँकामध्ये ई-केवासी करण्याकरीता जात आहेत. बँकेच्या मर्यादित वेळेमुुळे अनेक महिलांचे ई-केवासी शनिवारी न झाल्याने महिला संतप्त झाल्या होत्या.
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिंगोली येथे सर्वांधिक महिलांची ई-केवासी (E-KYC)करीता प्रत्येक दिवशी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे बँकेतर्फे अपुरी व्यवस्था असल्याने महिलांना रस्त्यावर रांग करून उभे राहावे लागत आहे. त्यातच बँकेमध्ये कर्मचार्यांकडुन कामे संथ गतीने सुरू असल्याने अनेक महिलांना दिवसभर रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. शनिवारी ई-केवासी साठी आलेल्या मर्यादित महिलांचीच E-KYC झाली आणि बँकेचा वेळ संपल्याचे कारण दर्शवुन रांगेत उभे असलेल्या महिलांची ई-केवासी केलीच नाही.
बँकेमध्ये अपुरी व्यवस्था व कर्मचार्यांंची संथ गतीने कामे
हिंगोलीतील स्टेट बँक ऑफ व शिवाजी नगर भागातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये महिलांची E-KYC साठी प्रत्येक दिवशी गर्दी राहत आहे. बँकेमध्ये अपुरी व्यवस्था असल्याने महिलांना बँके बाहेर रांग करून उभे रहावे लागत आहे. त्यातच एकाच कॉऊटरवरून कामकाज सुरू असल्याने दिवसभर महिलांना ई-केवासी करण्याकरीता रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. (CM Ladki Bahin Yojana) विशेष म्हणजे बँकेतील कर्मचारी केवळ बँकेची वेळ साधुन संथ गतीने कामे करीत असल्याने अनेक महिलांना केवासी विना घरी परतावे लागत आहे. त्यामुळे याबाबीकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालुन महिलांची होणारी गैरसोय दुुर करावी अशी मागणी महिला वर्गातुन केली जात आहे.