मुंबई (CM Majhi Ladki Bahin Yojana) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जून महिन्यात महिलांसाठी (CM Majhi Ladki Bahin Yojana) माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री शिंदे सरकारकडून महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीत (CM Majhi Ladki Bahin Yojana) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’मध्ये सहा दुरुस्त्या करण्यात आल्या असून, त्यामुळे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणे सोपे झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने ही योजना सोपी करण्यासाठी आणि अधिक पारदर्शकता यावी, यासाठी हे बदल केले आहेत. (CM Majhi Ladki Bahin Yojana) माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी महाराष्ट्र शासन 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान जाहीर करण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दोन महिन्यांसाठी लाभ म्हणून त्यांच्या (Post Bank Accounts) बँक खात्यातून थेट 3000 रुपये मिळणार आहेत.
माझी लाडकी बहीण योजना नवीन नियम आणि अटी
- लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाती स्वीकारली जातील.
- महाराष्ट्राबाहेर जन्मलेल्या परंतु स्थानिक पुरुषाशी विवाह केलेल्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या पतीच्या कागदपत्रांचा वापर करू शकतात.
- लाभार्थी महिलांची यादी दर शनिवारी ग्रामस्तरीय समितीद्वारे वाचून अद्ययावत केली जाणार आहे.
- केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना ऑफलाइन अर्ज भरावे लागणार आहेत.
- तत्काळ विवाह नोंदणी करणे शक्य नसल्यास, महिलेच्या विवाह प्रमाणपत्रानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा मान्य केला जाणार आहे.
- OTP चा कालावधी 10 मिनिटे निश्चित करण्यात आला आहे.