योजनेची कार्यवाही कौशल्य विकास विभागाच्या मान्यतेनेच करा
हिंगोली (CM Youth Yojana) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबवली जात आहे. ही (CM Youth Yojana) योजना पुढे राबविण्याबाबत करावयाची कार्यवाही ही कौशल्य विकास विभागची मान्यता असल्याशिवाय ऑफलाईन पद्धतीने न करण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.
आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार शासकीय व खाजगी आस्थापनांनी युवा कार्य प्रशिक्षणार्थींना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय हिंगोली यांना संपर्क न करता परस्पर ऑफलाईन पद्धतीने नियुक्ती कोणत्याही आस्थापनांनी देऊ नये. ही योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे (CM Youth Yojana) ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणारी नियुक्ती नामंजूर करण्यात येत आहे.
तसेच दि. 13 जानेवारी 2015रोजी नंतर cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील ॲड कँडिडेट हा टॅब शासनाने बंद केले आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या मान्यतेशिवाय कोणीही नविन नियुक्ती किंवा मागील तारखेतील नियुक्ती देऊ नये, अशा प्रकारे नियुक्ती दिल्यास यांची जबाबदारी संबंधित आस्थापना प्रमुखावर राहील कृपया यांची नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले आहे.
शासकीय व खाजगी आस्थापनांनी या योजनेअंतर्गत युवा कार्य प्रशिक्षणार्थी या (CM Youth Yojana) आस्थापनेवर रूजू करुन घेतले आहेत. त्यानुसार प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन सुद्धा दरमहा अदा करणे चालू आहे. मात्र, नवीन नियुक्ती न देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत काही अडचण आल्यास ०२४५६-२२४५७४ किंवा ७९७२८८८९७०, ७३८५९२४५८९ येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.