कन्हान (Coal Mine Crime) : वेकोलि कामठी खुली कोळसा खदान येथी ल सुरक्षा कर्मचारी किशोर सूर्यवंशी हा कामा वरून रात्री घरी परत जाताना शिवगिरी शाळेजवळील रस्त्या वर ट्रक च्या आड लपुन बसलेल्या अज्ञात आरोपी ने त्याची दुचाकी थाबंवुन हल्ला करित काठी व दारूच्या बाटल ने मारून गंभीर जख्मी केल्याने तो दवाखान्या त मुत्युशी झुंज देत आहे.
रविवार (दि.४) मे ला वेकोलि कामठी खुली (Coal Mine Crime) कोळसा खदान येथील सुरक्षा कर्मचारी किशोर शिवकरण सूर्यवंशी वय २९ वर्ष रा. मडीबाबा कॉलोनी खदान नं. ३ हे सायंकाळी ४ वाजता कामावर होंडा ड्रिम नियो क्र एमएच ४० एवाय २३७७ दुचाकीने गेले होते. त्यांची पत्नी सौ कूसुम सूर्यवंशी हिने रात्री ८ व ११.३० वाजता त्यांचे सोबत फोनवर बोलली आणि झोपली. ४ ते १२ वाजे पर्यंत डियुटी असुन रात्रीचे १ वाजले तरी ते घरी न आल्याने तिने आपल्या पती ला फोन केला असता आशा हॉस्पिटल कामठी च्या नर्स ने फोन उचलुन सांगितले कि तुम्हचे पती दवाखान्यात भर्ती आहे.
‘तुम्ही लवकर या’ असे म्हटल्याने सौ कूसुम एका वर्षाच्या लहान शिवांश सोबत घेऊन दवाखान्या त पोहचल्यावर पती किशोर हे गंभीर जख्मी असल्या ने आयसीयु मध्ये असुन उपचार सुरू होता. आशा हॉस्पीटल मध्ये आल्यावर माहिती मिळाली की, त्यांचे पती किशोर हे रात्री १२ वाजता ड्युटीवरून घरी परत येत असताना खदान नं. ३ शिवगिरी शाळे जवळील रस्त्यावर ट्रकच्या आड लपुन बसलेल्या अज्ञात आरो पीने त्याची दुचाकी थाबंवुन (Coal Mine Crime) हल्ला करित काठी व काचेच्या दारूच्या बाटल ने डोक्यावर मारून गंभीर जख्मी केल्याने ते खाली पडल्यावर आरोपी पळुन गेले. तेवढयात एमएसएफ चे सुरक्षा रक्षक सुरज ब्राम्हणवाडे आणि कुणाल गिरे तेथुन जाताना त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत किशोर पडलेला दिसल्याने त्यानी उचलुन जे एन दवाखान्यात नेले असता डॉक्टर ने लगेच रेफर केल्यान कामठी येथील खाजगी आशा हॉस्पिटल मध्ये भर्ती करून आयसीयु मध्ये उपचार सुरू असुन किशोर मुत्युशी झुंज देत आहे.
कन्हान पोलीसानी सोमवार (दि.५) मे ला किशोर सूर्यवंशी यांच्या पत्नी सौ. कुसुम किशोरी सूर्यवंशी वय २४ वर्ष यांचे तोंडी बयाणावरून अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान उपविभा गिय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांनी घटना स्थळी भेट देऊन त्यांचे मार्गदर्शनात (Coal Mine Crime) कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.




