रिसोड (Code of Conduct) : विनापरवाना प्रचार केल्याप्रकरणी एका वाहन चालकावर गुन्हा दाखल (Risod Crime) करण्याची कारवाई निवडणूक आयोगाच्या फिरते पथकाने 11 नोव्हेंबर रोजी रिसोड तालुक्यातील रिठद येथे केली. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की,फिरते पथक प्रमुख बाळकृष्ण दिगंबरराव देशमुख यांनी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली की, रिसोड तालुक्यातील वाघी येथील रहिवाशी सिद्धार्थ ज्ञानोबा खिल्लारे वय 44 वर्ष हा आपल्या वाहनावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत सुधीर गोळे यांच्या प्रचाराचे बॅनर लावून रिठद परिसरात विनापरवानगी प्रचार करीत असल्याचे निदर्शनास आल्यावरून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन (Code of Conduct) व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी विवीध कलम अनन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई वाशिम जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात फिरत्या पथकाने केली असून पुढील कारवाई वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.
रिसोड मालेगांव विधानसभा मतदारसंघांमध्ये अजूनही शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आदर्श आचारसंहिता (Code of Conduct) होत असल्याचे दृश्य निर्माण झालेले आहेत. विनापरवाना घरावर,रस्त्यावर, झाडावर व खांबावर असंख्य प्रचार बॅनर लागले आहेत. याकडेही फिरते पथक लक्ष देतील का असा प्रश्न सामान्य मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.