– गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील प्रकार
गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली-चिमुर लोकसभा (Gadchiroli LokSabha) मतदार संघाचे ईंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान (Dr. Namdev Kirsan) यांच्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचे व्यक्तिगत चारित्र्य ,वर्तन , संबंधाने खोटी माहिती संदर्भाने गडचिरोली येथील राजेश कॉम्प्युटर्स यांच्याकडे पत्रके छापून माहिती प्रसिद्ध केली होती.
या संदर्भात इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान (Dr. Namdev Kirsan) यांनी तक्रार दाखल केली होती. यावरून (Code of conduct) आचारसंहितेचा भंग झाला म्हणून निवडणूकीपूर्वी भाजपावासी झालेले माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी व डॉ. नितीन कोंडवते यांच्याविरुद्ध २४ एप्रिल रोजी गुन्हा नोंद झाल्याची माहिती, (Gadchiroli Election) गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मार्गोनवार यांनी दिली आहे. डॉ. उसेंडी तसेच डॉ. कोडवते यांच्याविरुद्ध भादंवि १७१(ग ) (१)सह कलम लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ ते कलम १२३(४) उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद झाल्याची माहिती, (Gadchiroli Police) उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.