वसमत शहरातील घटना!
हिंगोली (Code of Conduct) : वसमत शहरात सभेच्या कारणामुळे बॅनर लावल्याने आदर्श आचार संहीतेचा भंग केल्या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात वंचित बहूजन आघाडीच्या तिघांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
वंचित बहूजन आघाडीच्या सभेनिमित्त २२ ठिकाणी विना परवाना लावले होते बॅनर!
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि वसमत नगर पालिका निवडणुकीची प्रक्रीया सुरू असल्याने आदर्श आचार संहीताही लागू करण्यात आली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करण्या करीता पोलिसांसमवेत अनेक पथकेही कार्यरत आहेत. वसमत येथील ग्रामीण पोलिस ठाणे व गवळी मारोती मंदिर ते आसेगाव टी पॉईंट रस्त्याच्या दुभाजकावर २२ ठिकाणी विद्युत खांबाला विना परवाना प्रकाश आंबेडकर सुजात दादा आंबेडकर व प्रभावती खंदारे महिला जिल्हाध्यक्ष हिंगोली यांचे फोटो असलेले बॅनर व त्यावर सुजात दादा आंबेडकर यांची जाहीर सभा अशा मजकुराचे वंचित बहूजन आघाडीच्या वतीने सभेचे बॅनर लावण्यात आले होते. त्यावरून वसमत नगर पालिकेचे लिपीक अरविंद नामदेव शिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या संदर्भात वसमत शहर पोलिसात रितसर तक्रार दिली. वसमत शहरात बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करून आदर्श आचार संहीतेचा भंग केल्या प्रकरणी वंचित बहूजन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकूंद करवंदे, कामगार आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष शेख रफी सुलेमान जिल्हा युवा अध्यक्ष वंचित बहूजन का. आ. ता. वसमत, विश्वनाथ रंगनाथ बोखारे रा. शहरपेठ वसमत या तिघा विरूध्द आदर्श आचार संहीतेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, जमादार शेख नय्यर हे करीत आहेत.




