मनोज जरांगे समर्थक बाळासाहेब काजळे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
जिंतूर (Manoj Jarange) : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी येत्या विधानसभेत इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरविले होते. म्हणून जिंतूर सेलू विधानसभेत उमेदवारी दाखल करताना अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क मराठा समाजातील नागरिकांनी एक, दोन,पाच रुपयांची नाणी जमा करून दिली असल्यामुळे मोजदाद करताना प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मागील दीड वर्षांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आपला लढा लढत आहेत. मात्र राज्यसरकारने मराठा आरक्षण दिले नसल्यामुळे येत्या विधानसभेत उमेदवार उभे करण्याचे ठरविले होते. यासाठी आरक्षण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याना आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सांगितले होते. म्हणून जिंतूर तालुक्यात मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय काम करणारे बाळासाहेब काजळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने समाजातील नागरिकांनी एक,दोन,पाच रुपयांची नाणी जमा केली होती. ही नाणी अनामत रक्कम म्हणून संबंधित उमेदवार काजळे यांनी अनामत रक्कम जमा करण्यात आली यावेळी नाणी मोजण्यासाठी वेळ लागला असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. यावेळी केवळ एक हजार रुपयांची नाणी प्रशासनाने स्वीकारली दरम्यान मकरंद अनासपुरे यांच्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाची आठवण झाली.