पुसद(Yawatmal) :- दहा चे व विस रुपयाचे नाणे चलनात सूरु असतांनाही ते बाद झाल्याच्या अफवेला बळी पडून काही महिन्यापूर्वी 10 व 20रु च्या नाण्यांना ग्राहक आणि दुकानदार(shopkeeper) नाकारत होते. त्यामुळे 10 व 20 रु.च्या फाटक्या व जीर्ण झालेल्या नोटा देखील व्यवहारात सुरु होत्या.
चेबर ऑफ कॉमर्स तर्फ तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले
फाटक्या नोटांमुळे अनेकदा वाद उद्भवत होते. त्यामुळे या समस्येवर उपाय काढून 10 चे व 20चे नाणे (coin) चलनात सुरु आहे. या बाबत जनजागृती करावी म्हणून पुसद चेबर ऑफ कॉमर्स तर्फ तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच शहरातील विविध बँकांना व्यापाऱ्यांकडून १०चे नाणे जमा करून घेण्यासाठी निवेदन दिले होते. फाटक्या नोटांच्या वाढत्या समस्येमुळे अखेर काही प्रमुख व्यापाऱ्यांनी दहाचे व विस चे नाणे घेणे देणे सुरु करून ग्राहकांमध्ये जागृती सुरु केली. वरील सर्व उपायांचा परिपाक म्हणजे दहा व विस रु. च्या नाण्याची मागणी सुरु झाली एकूणच व्यावसायिक व ग्राहकांसाठी नावडते झालेल्या १०रु च्या नाण्यांना पुसद मध्ये “अच्छे दिन “आले आहेत.