जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी बैठकीत घेतला आढावा
हिंगोली (Collector Abhinav Goyal) : जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) शनिवारी आरोग्य विभागाची बैठक घेतली असता. त्यात जिल्ह्यातील आरोग्य संस्थानच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर काहींना फैलावर घेऊन Primary Health center) आरोग्य संस्थामधील रेफरल ऑडीट करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.(
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात २१ सप्टेंबरला जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैâलास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतिष ऋणवाल, डॉ. सावंत, डॉ. केंद्रेकर, डॉ. काळे यासह आरोग्य विभागातील कर्मचार्यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा तालुका निहाय आढावा घेतला. ज्यामध्ये राष्ट्रीय कार्यक्रमाचे दिलेले उदिष्ट आणि किती उदिष्ट पूर्ण झाले याची माहिती घेतली असता बहूतांश तालुक्यात या कार्यक्रमांतर्गत कामकाज कमी झाले असल्याचे लक्षात येताच त्यांनी उपस्थितांना धारेवर धरून किती रुग्णांची दररोज तपासणी केली जाते व किती रुग्ण रेफर केले जातात याची माहिती विचारली असता ती माहिती सुध्दा देताना अधिकारी गोंधळून गेल्याने गोयल यांनी चांगलेच धारेवर धरले.
जिल्ह्यातील बहूतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना रेफर केले जात असल्याची ओरड होत असल्याने त्या संदर्भातही गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी अधिकार्यांना जाब विचारला संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढत नसल्याचे आढाव्यातून निदर्शनास आल्याने ते प्रमाण का वाढत नाही अशी विचारणा केली. एकुणच परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी गोयल यांनी घेतला असता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे रेफरल ऑडीट करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. त्याच प्रमाणे ज्यावेळी रुग्ण उपचारासाठी दाखल केला जातो त्यावेळी रुग्णांवर योग्य पध्दतीने औषधो उपचार करावा, चुकीच्या पध्दतीने रुग्णांना इतरत्र रेफर केल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी पदभार स्विकारल्यापासुन अनेक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. आरोग्य विभागाच्या कामकाजात चालढकल त्यांच्या निदर्शनास आल्याने अधिकार्यांना त्यांनी तंबी देऊन कामकाजात सुधारणा घडवुन आणण्याच्या सुचना दिल्या.