– जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (Collector Abhinav Goyal) : जिल्हा वार्षिक योजनेचा मंजूर निधी विविध विकास कामांवर खर्च करुन नियोजित कामे संबंधित यंत्रणांनी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी आज दिले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्यासह संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी गोयल (Collector Abhinav Goyal) पुढे म्हणाले, संबंधित यंत्रणांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करुन विकास कामे सुरु करावीत. मंजूर झालेली सर्व कामे तातडीने देऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सन 2025-26 चा आराखडा प्रारुप आराखडा आयपास प्रणालीवर भरुन सादर करण्याच्या सूचना केल्या. मंजूर संपूर्ण निधीचा विनीयोग करुन निधी परत जाता कामा नये, याची खबरदारी घ्यावी. तसेच मागील वर्षीची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले.