लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
वाशिम(Washim):- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी आज २६ एप्रिल रोजी सिविल लाईन्स येथील लॉयन्स विद्या निकेतन शाळा (Vidya Niketan School) या मतदान केंद्र क्रमांक २२६ येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
या ठिकाणी करण्यात आलेली सजावट आणि स्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी यांनी बूथ ऑफिसर यांचे कौतुक केले. सर्व मतदारांनी आपल्या अधिकाराचे वापर करून अवश्य मतदान करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी श्रीमती बुवनेश्वरी यांनी बोलका रोबोट, मी मतदान केल्याचे सेल्फी पॉइंट (Selfie point) येथे सेल्फी घेऊन एनसीसी व स्काऊटच्या विद्यार्थिनी सोबत संवाद साधला व त्यांच्यासोबतही सेल्फी काढली. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही (Plantation) करण्यात आले यावेळी उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस यांची प्रमुख उपस्थिती होती.