हिंगोली (Illegal sand Tipper) : एकीकडे पोलीस व महसुल प्रशासनाकडुन अवैध रेती उत्खन्न व वाहतुक प्रकरणात कारवाई केली जात असताना शुक्रवारी खुद्द जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी डिग्रस फाट्यावर अवैध रेतीसह टिप्पर पकडुन हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात लावले.
जिल्ह्यात अवैध रेती उत्खन्न व वाहतुक विरोधात जोरदार मोहिम राबविली जात आहे. या निमित्ताने अनेक टिप्पर व ट्रॅक्टर अवैध रेतीसह जप्त करून गुन्हे ही दाखल केले जात आहेत. १६ जानेवारी रोजी हिंगोली ते औंढा नागनाथ रस्त्यावरून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे जात असताना त्यांना (Illegal sand Tipper) एका टिप्परमध्ये अवैध रेती दिसुन आली. टिप्पर थांबवुन चालकाकडे विचारणा केली असता कोणताही परवाना मिळुन आला नसल्याने टिप्पर क्र. एमएच ३८ एक्स ५०२२ हे हिंगोली ग्रामीण ठाण्यात आणुन पुढील कारवाईसाठी पोलीसांच्या स्वाधीन केले. यासंदर्भात उशिरा कारवाईची प्रक्रिया सुरू होती.




