औंढा नागनाथ (Mahashivratri festival) : येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचा महाशिवरात्र उत्सव (Mahashivratri festival) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून महाशिवरात्र उत्सवानिमित्त 15 फेब्रुवारी रोजी रात्री भव्य ड्रोन लाईट शो होणार आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन, यांनी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान लेझर ठिकाणाची, मंदिर परिसराची, भक्तनिवास, पार्किंग व्यवस्था, दर्शन व्यवस्थेची पाहणी करत अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तृप्ती पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण, पोलीस उपनिरीक्षक यशवंत गुरुपवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंजाब थिटे, महावितरणचे सहाय्यक अभियंता किरण मोरे, मंदिराचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, गार्ड प्रमुख बबन सोनूणे, पंडीत देशमुख, नितेश कुलकर्णी, यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ड्रोन लाईट शो, वाहनतळ या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या, विद्युत फोकस बसविण्याच्या, व्हीआयपी साठी स्टेज तयार करणे, आलेल्या भाविक भक्तांना पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा बाबत बेड तयार ठेवणे, ऑक्सीजन तसेच 108 अंबुलन्स तैनात ठेवाव्या, तसेच स्वच्छते सह विविध सूचना अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या. तर पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी बंदोबस्त अनुषंगाने माहिती घेतली दरम्यान महाशिवरात्रीला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.




