निमित्त मुक्ती दिवसाचे; बुलढाणा जिल्ह्यातील बंजारा भगिनींचा सहभाग!
बुलढाणा (Banjara culture) : काँग्रेसची मुळं तळागाळापर्यंत पोहोचली आहेत. म्हणून काँग्रेस संपवणारे संपले, पण काँग्रेसचे जिवंत आहे. काँग्रेसमुक्त भारत, हे विरोधकांसाठी स्वप्न बनूनच राहिले आहे. मात्र गोरगरिबांच्या प्रत्येक स्वप्नांना आकार देत त्यांना साकार करण्याचा प्रवास म्हणजे काँग्रेस आहे. काँग्रेसची मुळे किती खोलपर्यंत रुजलेली आहे, याच प्रत्यंतर आलं ते, नवी दिल्ली येथील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आज रविवार 1 सप्टेंबर रोजी. मुक्ती दिवसाच्या विशेष कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो (Banjara culture) बंजारा भगिनींनी विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत (Sonia Gandhi) सोनिया गांधी यांच्यासह खा. मुकुल वासनिक (MP Mukul Wasnik) व अनेक राष्ट्रीय नेत्यांचे लक्ष वेधले.
खा. मुकुल वासनिक व संजय राठोड यांनीही धरला बंजारा नृत्यावर ठेका
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनुसूचित विभागाच्या व घुमंतू व अर्धघुमंतू तथा विमुक्त जनजाती विशेष पथक यांच्या वतीने “मुक्ती दिवस” हे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बुलढाणा येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो बंजारा भगिनी नवी दिल्ली येथे पोहोचल्या होत्या. त्यांनी पारंपरिक वेषात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तथा नृत्य करून सोनिया गांधी यांच्यासह सर्वांचेच लक्ष वेधले. त्यांनी (Sonia Gandhi) सोनिया गांधी यांचा बंजारा महिलांचे पारंपारिक आभूषणे (Banjara culture) देऊन सत्कारही केला. विशेष म्हणजे याच महिलांनी “भारत जोडो यात्रा” घेऊन जेव्हा राहुल गांधी बुलढाणा जिल्ह्यातून गेले होते, तेव्हाही अशाच प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम व बंजारा नृत्य सादर करून त्यांचेही लक्ष वेधले होते.
दिल्ली येथील मुक्ती दिवसाच्या कार्यक्रमाला सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासह राज्यसभा खासदार मुकुल वासनिक, राष्ट्रीय काँग्रेसचे समन्वयक के. राजू , राष्ट्रीय काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठीया यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड (Sanjay Rathod) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बंजारा भगिनी या खा. मुकुल वासनिक (MP Mukul Wasnik) यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. तिथे असलेल्या गार्डनमध्ये त्यांच्यासोबतच खा. मुकुल वासनिक व संजय राठोड यांनीही धरला बंजारा नृत्यावर ठेका धरला. नुकताच बुलढाणा येथे “भव्य रोजगार महोत्सव 2024” संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता, त्याचाही थकवा या नृत्याने गेला !