चाकूर (Parbhani):- परभणी शहरातील दलित वस्त्यांमध्ये पोलिसांनी राबविलेले कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवा; अन्यथा व्ही.एस. पँथर्स तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
व्हीएस पँथर्सची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
परभणी येथील घटनेनंतर पोलीस दलित वस्तीमध्ये जाऊन कोंबिंग ऑपरेशन (Combing operation) करून युवकांना पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन खोटे गुन्हे(Fraud Crime) दाखल करत आहेत. हे त्वरित थांबवावे; अन्यथा व्ही.एस. पँथर्स तीव्र आंदोलन छेडेल, याची प्रशासनाने दखल घ्यावी, असे निवेदन चाकूर तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. व्ही. एस. पँथर्सच्या जिल्हा शाखेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विनोद खटके, प्रदेशाध्यक्ष सचिन मस्के यांच्या सूचनेनुसार दिलेल्या या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शरद किनीकर, तालुकाध्यक्ष अजय वाघमारे, गजानन कांबळे, समाधान गायकवाड, मयूर कांबळे, प्रतिपाल गवळे, शेषराव कांबळे, प्रतीक कांबळे, सुशांत गायकवाड, दयानंद कांबळे, विकास कांबळे, आदित्य कांबळे, पृथ्वीराज कांबळे, अनिकेत बेडे, रजत भोळे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.