परभणी (Parbhani):- अहमदनगर येथे भडकाऊ भाषण देत जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केल्यामुळे आ. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी करत साथी सेवाभावी संस्थेच्या वतीने गुरुवार ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध आंदोलन करण्यात आले. यानंतर मागण्यांचे निवेदन राज्याचे गृहमंत्री(Home Minister), पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले.
भडकाऊ भाषण करत मुस्लीम समाजाला धमकी देणार्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई (action) करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर बशीर अहेमद, मो. जाफर अन्सारी, अॅड. मुदस्सीर अन्सारी, आरेफ मास्टर, मोहसीन सुलतान, वाहेद खान, यामीन पटेल,इम्रान खान, साजीद बेलदार, जाफर तरोडेकर, अमजद पटेल, उबेद उर रहेमान, शेख मुज्जमील, शेख इरशाद, शेख वसीम, दानिश शेख आदींच्या स्वाक्षर्या आहेत.