नांदेड (Nanded):- राष्ट्रवादी काँग्रेसचे(Nationalist Congress) आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awad) यांनी महाड येथील चवदार तळ्यावर शालेय अभ्यासक्रमात मनस्मृतीचे श्लोक(Manasmriti verses) समाविष्ट करण्यात येणार असल्याने मनस्मृतीचे दहन करत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडला होता. त्या घटनेचा भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) वतीने निषेध करण्यात आला असून आज गुरुवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आमदार आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर आव्हाड यांच्यावर ॲट्रॉसिटी (Atrocity) दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.