परभणीतील कलावंतांची बैठक; डॉ. विेवेक नावंदर यांचे आश्वासन
परभणी (MLA Dr. Patil) : शहरातील कलावंताच्या प्रमुख मागणी, समस्या या आजपर्यंत शासन दरबारी आ. डॉ. राहूल पाटील यांनी मांडल्या आहेत. नवीन नाट्यगृह निर्मीतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. वेळोवेळी निधीसाठी पाठपुरावा केला. आता उर्वरित निधी या शासनाने दिला नाही. तरी आगामी काळात या नाट्यगृहासाठी निधी आणण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन या प्रसंगी डॉ.विवेक नावंदर यांनी उपस्थितांना दिले.
परभणी शहरातील स्थानिक कलावंताची बैठक वैष्णवी मंगल कार्यालयात रविवारी पार पडली. बैठकीस मंचावर विजय करभाजन, किशोर पुराणिक, पांचाळ, सूकते, संजय पांडे, कुलकर्णी, उपेंद्र दुधगावकर, संकेत पांडे, चांदजकर यांच्यासह शहरातील कलावंत उपस्थित होते. आ.डॉ.राहुल पाटील यांनी आज पर्यंत कलावंतांसाठी केलेल्या कार्याची माहिती डॉ.विवेक नावंदर यांनी बैठकीत सांगितली. ते पुढे म्हणाले, स्थानिक कलावंतांनी परभणी शहराचे नाव जगभरात आपल्या कलेच्या माध्यमातून पोहचविले आहे. त्यांना विविध बाबींची सुविधा परभणी शहरात उपलब्ध करुन देण्यासाठी आ. पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले. यापुढेही त्यांची कलावंताना साथ राहिल अशी ग्वाही डॉक्टर नावंदर यांनी दिली. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी, गायक कलावंत तथा लोककलावंत यांची प्रचंड उपस्थिती होती. त्यात कलावंतांच्या समस्या व विविध मागण्यावर चर्चा झाली.
ब्राम्हण भवन उभारू
आ. डॉ.राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात निर्माल्य संकलन ग्रुपतर्फे आशीर्वाद रुपी बैठक घेण्यात आली. महाविकास आघाडी तथा शिवसेना उबाठा गटाचे परभणीचे उमेदवार आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या बैठकीस निर्माल्य संकलन ग्रुप, ज्येष्ठ नागरिक मंचचे सदस्य, ब्राह्मण समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, पुजारी उपस्थित होते. बैठकीत शहरात सुसज्ज ब्राह्मण भवन उभारण्याचे आश्वासन आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिले.