पाथरी (Parbhani):- पंढरपुर येथील देगाव येथे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या स्थानिक विकास निधी मधून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण वारकरी संप्रदायातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आ.दुर्राणी यांचे हस्ते आषाढी एकादशीच्या(Ashadhi Ekadashi) मुहूर्तावर १७ जुलै रोजी सकाळी ११ वा करण्यात आले.
देगाव पंढरपुर येथे वारकऱ्यांसाठी सभामंडपाची उभारणी
पंढरपूर येथील आढिव विसावाजवळ ( बार्शी रोड ) श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात विधान परिषद(Legislative Council) सदस्य आ . बाबाजानी दुर्राणी यांच्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या सभामंडपाचा भव्य लोकार्पण सोहळा बुधवार १७ जुलै रोजी आषाढी एकादशी च्या मुहूर्तावर संपन्न झाला . यावेळी झालेल्या कार्यक्रमास श्री.ह.भ.प. गुरुवर्य शांतीब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर , ह. भ. प. गुरुवर्य प्रेममूर्ती नामदेव महाराज ढवळे चारठाणकर, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. गुरुवर्य बापूसाहेब महाराज मोरे , श्री . ह . भ . प . गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम मोठे माऊली (अध्यापक वारकरी शिक्षण संस्था, आळंदी), प्रमुख पाहुणे म्हणून समाधान घाडगे सरपंच देगाव, संजय घाडगे माजी सरपंच देगाव पंढरपूर, नानासाहेब राऊत, राजेंद्र दुबल यांची उपस्थिती होती.
संत महंताच्या उपस्थित लोकार्पण सोहळा संपन्न
प्रारंभी आ. दुर्राणी यांचे विठूनामाच्या गजरात व टाळ मृदंग वाजवत उपस्थित संप्रदायातील वारकर्यांनी स्वागत केले . यावेळी उपस्थित संत महंत , वारकरी बांधव व शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांशी आ . दुर्राणी यांनी संवाद साधला . यावेळी आ.दुर्राणी यांनी टाळ मृदंगाच्या गजरात व भजनाच्या तालावर फुगडी खेळण्याचा आनंद ही घेतला. कार्यक्रमाला पाथरी येथुन सुभाष कोल्हे , अनिलराव नखाते , नानासाहेब राऊत , आण्णासाहेब रणेर , प्रताप देशमुख , अविनाश काळे , शाम धर्मे , वैजनाथ महिपाल , विष्णुपंत उगले , विष्णु काळे , सिध्दु पाटील , विष्णु चव्हाण , संदिप टेंगसे , श्री विष्णु घांडगे , अनंत वाकणकर , राजेश ढगे , दिगांबर लिपणे , गणेश दुगाणे , अशोक अरबाड , बंटी पाटील , अंगद कोल्हे , रंगनाथ पाईघीरे , राजेंद्र नागरे यांच्यासह संत ज्ञानेश्वर महाराज चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष , कमिटी आजीमाजी विद्यार्थी देगाव पंढरपुर येथील गावकरी मंडळी , श्रीक्षेत्र चारठाणा व आषाढ शुध्द एकादशी निमित्त पंढरपुर येथे येणारे वारकरी , भाविक भक्त यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
विकास निधितुन साकारलेल्या भव्य सभामंडपाच्या माध्यमातुन संतांची, वारकऱ्यांची सेवा घडत आहे
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी कोट्यावधी वारकर्यांचे श्रध्दास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे माझ्या स्थानिक विकास निधितुन साकारलेल्या भव्य सभामंडपाच्या माध्यमातुन संतांची , वारकऱ्यांची सेवा घडत आहे . सभामंडप उभारणीचे काम माझ्या हातून झाले , हे मी भाग्य समजतो . सर्वांचे आशीर्वाद , दुवा मला अधिकाधिक विधायक काम करण्यासाठी शक्ती देतात . २५ लक्ष रुपयांचा हा सभामंडप या आशीर्वादाचीच फेड करण्याचा छोटासा प्रयत्न आहे . आज लोकार्पण करताना याचा मनस्वी आनंद होतो आहे . पुढच्या आषाढ वारीपर्यंत याठिकाणी राहिलेले काम सुद्धा पूर्ण करण्याचा माझा मानस आहे .