नागपूर तालुका खरेदी विक्री समिती निवडणुक
नागपूर (Sunil Kedar) : नागपूर तालुका खरेदी विक्री समितीची निवडणुकी पार पडली व (Samiti Election) निवडणूकीचा निकाल सुद्धा आजच जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मंत्री व विद्यमान आ सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या सहकार आघाडी पॅनल ने दणदणीत विजय संपादन केला असून भाजपा समर्थीत पॅनलचा दारुण पराभव पतकरावा लागला. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आ. सुनील बाबू केदार व माजी मंत्री रमेश बंग साहेब यांच्या नेतृत्वात तर नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश नागपुरे यांच्या नियोजनात ज्याप्रमाणे मागील वर्षी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Samiti Election) भाजपाचा धुव्वा उडाला.
आ. सुनील केदार यांच्या सहकार आघाडी पॅनलचा दणदणीत विजय
तोच प्रकार आजच्या निवडणुकीत घडल्याने खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्रावर आजही सुनील केदार (Sunil Kedar) यांचा एकछत्री अंमल असल्याचे दिसून येते.नागपूर खरेदी विक्री समितीच्या निवडणुकीत भाजप समर्थीत उमेदवारांचे मतदान पाहता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे पदाधिकारी दिलीप माथनकर यांना फक्त ५ मते व तालुका अध्यक्ष सुनील कोडे यांना फक्त २ मते व इतर उमेदवारांना शून्य मते मिळाली यावरून पुनश्च पूर्ण नागपूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात माननीय सुनील बाबू केदार (Sunil Kedar) यांचे या संघभूमीमध्ये सहकार क्षेत्रामध्ये वर्चस्व प्रस्थापित आहे हे सिद्ध झाले आहे.
या निवडणुकीपूर्वी निवडणुकीमध्ये सहकार आघाडीच्या (Samiti Election) पॅनलच्या उमेदवारांना सेवा सहकारी गटातून संतोष राव भांगे 46 रॉबिन शेलार 46 गोपाल वांगे 45 संजय सांबारे 45 प्रकाश शिंदे 44 प्रभाकर आचार्य 43 साहेबराव उचके 43 बाबुराव खडसे 43 संजय चिकटे 42 मते मिळाली. त्याचप्रमाणे वैयक्तिक गटात तालुका भाजपचे अध्यक्ष सुनील कोडे २ मते प्रमोद गमे शून्य मते मिळाली व त्याच गटामधील आघाडीच्या उमेदवाराला किसना तुरंकर 128 मते नरेश शिंगणे 122 मते प्राप्त झाली व नाम प्र वर्गात बंडू सेलवटे यांना 176 मते व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी दिलीप माथनकर यांना अवघे ५ मते प्राप्त झाली. यावरून यांची सहकार क्षेत्रात काय दयनीय स्थिती आहे.
भारतीय जनता पार्टी समर्थित पॅनेलचा दारुण पराभव
ज्या पद्धतीने मागील काळामध्ये माननीय सुनील बाबू केदार यांच्या व माननीय बंग साहेब यांच्या नेतृत्वामध्ये प्रकाश नागपुरे उपसभापती बाजार समिती नागपूर व त्यांच्या सर्व सहकार्यानी हा किल्ला लढवत एकाकी सत्ता प्राप्त करून विरोधकांचे धाबे दणाणून सहकार क्षेत्रात निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे.