गोंदिया(Gondia):- गोंदिया जिल्ह्यात 9 सप्टेंबर पासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी (heavy rain) झाली असुन याचा फटका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अर्जुनी/मोरगाव तालुक्याला बसला यात केशोरी-चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या पुलाचा मागील 5 महिन्यापासून बांधकाम सुरु आहे.
पावसाचा हाहाकार केशोरी-चिचोली,केशोरी-वडसा मार्ग दुसऱ्या दिवशीही पावसामुळे बंद
या साठी पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र आलेल्या मुसळधार पावसाने (heavy rain) पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहतुकी करिता बंद आहे. यामुळे दुसऱ्या दिवशीही अर्जुनी/मोरगाव तालुका मुख्यालयाचा संपर्क तुटला आहे. तर केशोरी-खोळदा मार्गावरील वडेगाव/बंध्या गावाजवळ गाढवी नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने केशोरी-ब्रम्हपुरी बस सेवा बंद झाली असुन याचा फटका दवाखान्यात जाणाऱ्या नागरिकांनासह शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना, शाळेचे विद्यार्थी व ये-जा करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना बसला आहे. तर दुसरीकडे सध्या खरीपाचा हंगाम धान पिकाच्या निंदणाचे कामे सुरु असल्याने शेतकरी देखिल आपल्या शेतात तसेच शाळेतील विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. तर गोठणगाव येथील इटीयाडोह धरण 24 जुलै ओव्हरफ्लो झाला होता. तेव्हा पासुन ओव्हरफ्लो सुरुच असुन मधल्या काळात विसर्ग कमी झाला होता. परंतु दि.09 सप्टेंबर पासुन मुसळधार पाऊस सुरुच असल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरुन आज 10 सप्टेंबर रोजी 04 फुटाच्या जवळपास पाण्याचा विसर्ग सुरु असुन गाढवी नदी ओसंडुन वाहत आहे. यामुळे शेकडो हेक्टर शेती पुन्हा पाण्याखाली गेली आहे.