शासकीय कर्मचाऱ्यांना साधे बायोमॅट्रीकही नाही!
मानोरा (Online Ration Card) : तालुक्यातील गाव पातळीवर रेशनच्या दुकानात ई – पॉस मशीनवर अंगठा दिल्याशिवाय सर्वसामान्यांना रेशन मिळत नाही, माञ दर माहेवारी हजारो वेतन घेणाऱ्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना ऑनलाईन बायोमॅट्रिकची सक्ती नसल्याची शोकांतिका आहे.
काही कर्मचाऱ्यांसाठी राज्यशासनाचा कामकाजाचा आठवडा आता पाच दिवसांचाच आहे. इतर दिवसाची कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. परंतू काही कर्मचारी कार्यालयांत सकाळीं ११ नंतर येतात. व दुपारी गायब होतात. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, असा शासन नियम आहे. पण या निर्णयाला खो देत कित्येक कर्मचारी तालुका व जिल्हा स्तरावर राहत असल्याचे चित्र आहे. एका कामचुकार कर्मचाऱ्यांच्या पगार एवढा खर्च (Online Ration Card) बायोमॅट्रीक साठी खर्च येतो, तरीपण शासन याकडे दुर्लक्षित धोरण अवलंबित कर्मचाऱ्यांना मुभा देत असल्याचे दिसून येते. ग्राम पंचायत, नगर पंचायत, तहसिल , पंचायत समिती यासह विविध कार्यालयांत एक बायो मॅट्रीक मशिन लावले तरी कार्यालयात येणारे सर्व विभागाचे कर्मचारी त्यावर हजेरी नोंदवू शकतात, यात कर्मचाऱ्यांनाही फायदा आहे.
गाव पातळीवरील ई – पोस मशीनवर अंगठा दिल्याशिवाय सर्वसामान्य गरिबाला रेशन मिळत नाही, त्यासाठी (Online Ration Card) ऑनलाईन हजेरी आहे. पण हजारो रूपये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन सक्ती का नाही? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.