हिंगोली/ कळमनुरी (Talathi Sangh Strike) : हिंगोली जिल्ह्यातील विविध तालुक्याअंतर्गत अवैध गौण खनिज रात्री-बेरात्री वाहनाद्वारे रेती माफीया करत असून याचा भुर्दंड शासनाला बसत आहे. मात्र अवैध गौण खनिजाची वाहतुक रोखण्याकरीता पथके नेमण्यात आली आहेत. परंतु या पथकावरच रेती माफीयाकडुन वारंवार जिव घेणे हल्ले होत असल्याने त्या घटनेतील आरोपीवर योग्य ती कारवाई करून तात्काळ अटक करावी अन्यथा २३ डिसेबर सोमवार पासुन पाचही तालुक्यातील महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेकडुन कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवुन दिला आहे.
कळमनुरी तालुक्यातील कोंढुर येथील (Talathi Sangh Strike) तलाठी जगदिश कुलकर्णी यांना रात्री वाहन पकडल्यानंतर जबर मारहाण करून ट्रॉली खाली चिरडुन मारण्याचा प्रयत्न केला.अवैध रेती माफीयांनी रात्री- बेरात्री वाहनाद्वारे चोरट्या मार्गाने वाळु आणुन औंढा नागनाथचे मंडळ अधिकारी श्रीमती शिरसाट यांच्या दुचाकीला धडक देवुन रेतीने भरलेले वाहन पळवुन नेण्यात आले. तसेच नांदापुरचे मंडळ अधिकारी विनायक किनोळकर व तलाठी सोडेगावचे बेले यांनी सोडेगाव येथे अवैध गोण खनिज पथकावर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांना धमकी देवुन त्यांना ४ ते ५ अज्ञात व्यक्तीने विनानंबरचे ट्रॅक्टर पळवुन नेले.
तसेच महसुल ग्राममहसुल अधिकारी एकनाथ कदम व विशाल कदम यांना ट्रॅक्टरवरुन खाली पाडुन ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न केला. तसेच हिंगोली येथील मंडळ अधिकारी सय्यद आयुब सय्यद रसुल यांच्या पथकावर हल्ला करून गाडी अडवुन जिवे मारण्याची धमकी दिली. मागच्या महिन्यातील हा दुसरा हल्ला असल्याने या वाळु माफीयावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना अटक करावी तसेच पथकासोबत बंदुकधारी शिपाई देण्यात यावा व शासकीय वाहन देण्यात यावे. अन्यथा कोणतेही कर्मचारी पथकासोबत जाणार नसल्याचा इशारा १८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जिल्हा शाखा हिंगोली व महाराष्ट्र राज्य तलाठी संघ तालुका शाखा कळमनुरी यांनी प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.
या (Talathi Sangh Strike) निवेदनावर राज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष विनोद ठाकरे, विभागीय मराठवाडा अध्यक्ष स.आयुब स.रसुल, सरचिटणीस विनायक किन्होळकर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत. तर कळमनुरी तालुक्यात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी शाखा कळमनुरीचे अध्यक्ष एस.जे. शेवाळकर, व्ही.व्ही. पतंगे, ए.टी. काकडे, अमोल गंगावणे, पि.एस.चव्हाण, एकनाथ कदम, बि.एस.जाधव, वैâलास मोगले, विजय भंडारे, प्रतिक पालखेडे, बि.यु.बाट, विकास पंडीत, सिध्दार्थ लोणकर, जी.टि. माखणे, राहुल बोरकर, अक्षय मोहड, जयश्री अंभोरे, दिव्या गायकवाड यांनी कळमनुुरीचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देवुन या वाळु माफियावर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. अन्यथा सोमवार २३ डिसेंबर पासुन कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.