कारंजा(Washim):- कारंजा ग्रामीण पोलिसांनी देशी(Domestic), विदेशी दारू (foreign liquor)व एका कारसह एकूण १ लाख ५९ हजार २३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना २६ जून रोजी घडली होती. याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी स्थानिक एसी वाईन शॉपच्या (Wine shop) मालकावर गुन्हा केला आहे.
कारमधून विनापरवाना दारूची विक्री
प्राप्त माहितीनुसार, ग्रामीण भागात निळ्या रंगाच्या कारमधून विनापरवाना दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून ग्राम मोखड पिंप्री येथे ही कार पकडली. यावेळी एमएच १४ बीसी ५१२८ क्रमांकाच्या कारमध्ये देशी व विदेशी दारुच्या एकूण २० पेट्या ( किंमत ६९,२३० रु.) व अल्टो कार ( किंमत ९० हजार) असा एकूण १ लाख ५९ हजार ३२० रुपयाचा माल आढळून आला. या मालासह पोलिसांनी कारचालक रमेश जयराम गिरी (४८, तुळजाभवानी नगर, सिंधी कॅम्प कारंजा ) याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस स्टेशनमध्ये(Police Station) आणून विचारपूस केली असता, त्याने दारूचा साठा स्थानिक ए.सी. वाईन शॉपमधून विकत घेतला व मालकाच्या सांगण्यावरुन विक्रीसाठी घेवून जात असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सरकारतर्फे सफौ धनराज पवार यांच्या फिर्यादीवरून वाईनशॉपचे मालक अनिल चंदवाणी (रा.कारंजा) व कार चालकाविरुद्ध कलम ६५ ई (ई) मु.प्रो.ॲक्टअन्वये गुन्हा (crime) दाखल केला आहे.