Bangladesh violence:- बांगलादेशात सोमवारी (05 ऑगस्ट) सत्तापालट झाल्यानंतरही हिंसाचार (violence) थांबत नाही आहे. आंदोलक एकामागून एक अवामी लीगशी संबंधित नेत्यांना लक्ष्य करत आहेत. संतप्त जमावाची तालिबानी क्रूरता स्पष्टपणे दिसून येते.
पोलिस ठाण्यापासून ते कारागृहापर्यंत बदमाशांचा धुमाकूळ
बांगलादेशात, बदमाश आता अल्पसंख्याक हिंदू, शेख हसीना(Sheikh Hasina), त्यांच्या पक्ष अवामी लीगचे नेते-समर्थक आणि त्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहेत. पोलिस ठाण्यापासून ते कारागृहापर्यंत बदमाशांचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. हिंसाचाराच्या दरम्यान, आंदोलक आता हिंदू समुदायाच्या लोकांना लक्ष्य करत आहेत. मेहरपूरच्या इस्कॉन मंदिराची दंगलखोरांनी तोडफोड केली आहे. बांगलादेशात सोमवारच्या अशांततेत किमान 135 लोक ठार झाले ज्यात पोलिस गोळीबार, जमावाने मारहाण आणि जाळपोळ केली, असे ढाका ट्रिब्यूनने वृत्त दिले. सोमवारी निदर्शक आणि अवामी लीगच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान 96 जणांना जीव गमवावा लागला.
हॉटेलमध्ये 8 जिवंत जळाले
गलादेशच्या जेसोर जिल्ह्यात दंगलखोरांनी एका हॉटेलला आग लावली. ज्यामध्ये 8 जणांना जिवंत जाळण्यात आले होते. जे हॉटेल बदमाशांनी पेटवले ते अवामी लीगच्या नेत्या शाहीन चकलादार यांचे आहे. या घटनेत इतर 84 जण जखमी झाल्याची माहिती आहे. माजी क्रिकेटपटू मशरफी मुर्तझाच्या घराला आग लागली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अवामी लीगचे खासदार मश्रफी मोर्तझा यांच्या घराला आग लागली.