देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli: अभिनंदनास्पद! अवघ्या नऊ महिन्यात केलेल्या कार्याची जिल्हा स्तरावरून प्रशंशा
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाकरीअरपरभणी

Gadchiroli: अभिनंदनास्पद! अवघ्या नऊ महिन्यात केलेल्या कार्याची जिल्हा स्तरावरून प्रशंशा

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/17 at 4:50 PM
By Deshonnati Digital Published August 17, 2024

कोरची(Gadchiroli):- गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय महसूल विभागामार्फत सन २०२३-२४ या महसूल वर्षांमध्ये महसूल प्रशासनाला लोकाभिमुख व गतिमान करण्याकरिता केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल १५ ऑगस्ट २०२४ या स्वातंत्र्यदिनी महसूल पंधरवाडा समारोप निमित्त गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रशस्तीपत्र (Testimonial) देऊन गौरव केलं आहे. तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी यांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी महसूल पंधरवडा अंतर्गत प्रत्येक मंडळातील नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आहे.

कोरची तहसीलदार प्रशांत गड्डम यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यानी प्रशस्तीपत्र देऊन गौरविले

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशस्तीपत्रात केलेल्या उत्कृष्ट व बहुमोल कार्याबद्दल आपले अभिनंदन यापुढेही कार्यालयीन कामात माहिती तंत्रज्ञानाचे अद्यावत ज्ञान आत्मसात करून प्रशासकीय कामांमध्ये नवनवीन कल्पकतेचा वापर करून आपले काम अधिक लोकाभिमुख पारदर्शक व गती मानाने कराल याची मला खात्री असल्याचं शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. तर यापूर्वी सुद्धा गडचिरोली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी २५ जानेवारी २०२४ राष्ट्रीय मतदार दिनी सन २०२३ मधील मतदार यादी चे अद्ययावतीकरण, तक्रारीचे निवारण राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या कार्याबद्दल उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार २०२४ सन्मानपत्र देऊन तहसीलदार प्रशांत गड्डम यांना गौरवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील विविध शासकीय, प्रशासकीय, निम शासकीय अधिकारी कर्मचारी व असंख्य नागरिकांकडून अभिनंदनाचं (congratulations) वर्षाव सुरू आहे.

अवघ्या नऊ महिन्यातच त्यांनी शासकीय योजना

१५ जून २०२३ ला प्रशांत गड्डम हे कोरची तहसीलदार म्हणून रुजू झाले तेव्हापासून अवघ्या नऊ महिन्यातच त्यांनी शासकीय योजना, निवडणूक कार्यक्रम आणि विविध उपक्रमासह तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या मदतीने आम्ही अधिका अधिक विकास योजना लोकांपर्यंत पोहोचवू तालुक्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता, काळजी घेऊ अस तहसीलदार प्रशांत कदम यांनी शुभेच्छा दरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

नऊ महिन्यातील विकासात्मक केलेली शासकीय कामे

मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत व विविध विभागाअंतर्गत पाच शिबिराचं आयोजन करून त्यामध्ये ५८ हजार ४४१ नागरिकांना लाभ वितरित केला आहे. ६ अवैध गौण खनिज प्रकरणे, १५ महसूल प्रकरणे, ७३ अनाधिकृत आकृषिक, ६४ अतिक्रमण, ३ वैयक्तिक प्रकरणे, विशेष अर्थसहाय्य योजनेअंतर्गत १७८ प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. तसेच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, विकसित भारत संकल्प यात्रा, १ हजार १८८ शिधापत्रिका कार्ड वाटप व या कालावधीत चार ते पाच महत्त्वाचे उल्लेखनीय कामांचाही वर्णन त्यांनी केलेला आहे. याशिवाय महत्त्वाचं सन २०२३-२४ मध्ये १२२.२५ लक्ष शासकीय कर वसुली केली आहे.

[ruby_related total=5 layout=5]

TAGGED: congratulations, Gadchiroli, Testimonial

वाचण्यासारखी बातमी

Pathri Market Committee
मराठवाडापरभणी

Pathri Market Committee: परभणीच्या पाथरी बाजार समितीत अविश्वास ठराव पारित; बाबाजानी दुर्राणींची राजकीय ‘चाल’ यशस्वी!

November 11, 2025
General Election
मराठवाडापरभणी

General Election: परभणी महापालिका सदस्यांचे प्रभाग निहाय आरक्षण आज जाहीर!

November 11, 2025
Maratha Society
नांदेडमराठवाडा

Maratha Society: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कठोर करावाई करा नांदेडमध्ये सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलन!

November 11, 2025
Illegal Sands Crime
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal Sands Crime: अवैध रेती विरूध्द पोलिसांची आक्रमक मोहीम; चार टिप्पर पकडले

November 10, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?