कोरची(Gadchiroli):- गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय महसूल विभागामार्फत सन २०२३-२४ या महसूल वर्षांमध्ये महसूल प्रशासनाला लोकाभिमुख व गतिमान करण्याकरिता केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल १५ ऑगस्ट २०२४ या स्वातंत्र्यदिनी महसूल पंधरवाडा समारोप निमित्त गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रशस्तीपत्र (Testimonial) देऊन गौरव केलं आहे. तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी यांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी महसूल पंधरवडा अंतर्गत प्रत्येक मंडळातील नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आहे.
कोरची तहसीलदार प्रशांत गड्डम यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यानी प्रशस्तीपत्र देऊन गौरविले
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशस्तीपत्रात केलेल्या उत्कृष्ट व बहुमोल कार्याबद्दल आपले अभिनंदन यापुढेही कार्यालयीन कामात माहिती तंत्रज्ञानाचे अद्यावत ज्ञान आत्मसात करून प्रशासकीय कामांमध्ये नवनवीन कल्पकतेचा वापर करून आपले काम अधिक लोकाभिमुख पारदर्शक व गती मानाने कराल याची मला खात्री असल्याचं शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. तर यापूर्वी सुद्धा गडचिरोली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी २५ जानेवारी २०२४ राष्ट्रीय मतदार दिनी सन २०२३ मधील मतदार यादी चे अद्ययावतीकरण, तक्रारीचे निवारण राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या कार्याबद्दल उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार २०२४ सन्मानपत्र देऊन तहसीलदार प्रशांत गड्डम यांना गौरवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील विविध शासकीय, प्रशासकीय, निम शासकीय अधिकारी कर्मचारी व असंख्य नागरिकांकडून अभिनंदनाचं (congratulations) वर्षाव सुरू आहे.
अवघ्या नऊ महिन्यातच त्यांनी शासकीय योजना
१५ जून २०२३ ला प्रशांत गड्डम हे कोरची तहसीलदार म्हणून रुजू झाले तेव्हापासून अवघ्या नऊ महिन्यातच त्यांनी शासकीय योजना, निवडणूक कार्यक्रम आणि विविध उपक्रमासह तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या मदतीने आम्ही अधिका अधिक विकास योजना लोकांपर्यंत पोहोचवू तालुक्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता, काळजी घेऊ अस तहसीलदार प्रशांत कदम यांनी शुभेच्छा दरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
नऊ महिन्यातील विकासात्मक केलेली शासकीय कामे
मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत व विविध विभागाअंतर्गत पाच शिबिराचं आयोजन करून त्यामध्ये ५८ हजार ४४१ नागरिकांना लाभ वितरित केला आहे. ६ अवैध गौण खनिज प्रकरणे, १५ महसूल प्रकरणे, ७३ अनाधिकृत आकृषिक, ६४ अतिक्रमण, ३ वैयक्तिक प्रकरणे, विशेष अर्थसहाय्य योजनेअंतर्गत १७८ प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. तसेच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, विकसित भारत संकल्प यात्रा, १ हजार १८८ शिधापत्रिका कार्ड वाटप व या कालावधीत चार ते पाच महत्त्वाचे उल्लेखनीय कामांचाही वर्णन त्यांनी केलेला आहे. याशिवाय महत्त्वाचं सन २०२३-२४ मध्ये १२२.२५ लक्ष शासकीय कर वसुली केली आहे.