बैठकीत ठरली आंदोलनाची रुपरेषा
लातूर (Farmers Andolan) : राज्यातील शेतकरी विविध समस्यांवर मोर्चा उघडण्यासाठी लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३ मार्च रोजी व्यापक आंदोलन केले जाणार आहे. या (Farmers Andolan) आंदोलनाची तयारी आणि कार्ययोजना ठरवण्यासाठी शुक्रवारी दुपारी काँग्रेस भवन येथे जिल्ह्यातील तालुकास्तरीय नेत्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांना रास्त वीजपुरवठा, पीक विमा, कर्जमाफी, कृषि आवजारांवरील जीएसटी , सोयाबीन संशोधन केंद्र, देवणी वळू संशोधन केंद्र, शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले ठिबक अनुदान, सोयाबीन फरक, सोलार पम्प तत्काल देण्यात यावेत आणि उत्पादन खर्चाच्या आधारे पिकांचे भाव, दूध दरवाढ द्यावी, यासारख्या अन्य विविध मागण्यांवर भर देण्यात आला.
या (Farmers Andolan) बैठकीला ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, महिला काँग्रेस अध्यक्ष शीलाताई पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण बिरादार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक प्रा. ओमप्रकाश झुरळे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सिराजोद्दीन जहागीरदार, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. एकनाथ पाटील, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष सिकंदर पटेल, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, अरविंद भातांब्रे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष किशोर टोम्पे, इंटक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री राजकुमार कत्ते, एन एस यु आय विभागाचे जिल्हाध्यक्ष रामराजे काळे तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
सरकारच्या गैरधोरणांविरुद्ध लढा…
काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी यावेळी म्हणाले की, “हा संघर्ष फक्त काँग्रेसचा नसून, प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्कासाठी आहे. आम्ही शासनाच्या गैरधोरणांविरुद्ध एकत्र उभे राहू. यापुढेही सर्वसामान्य जनता, (Farmers Andolan) शेतकरी, युवक यांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आवाज उठवत राहील वेळप्रसंगी आंदोलन तीव्र करावे लागले तर ते देखील करेल, अशी भावना त्यानी यावेळी व्यक्त केली.