मानोरा (Washim) :- मुबंई येथील ५०० कोटी रुपयाचा भूखंड वाशीम – यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री (Guardian Minister) संजय राठोड यांनी हडपल्याचा आरोप कांग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेता विजय वड्डेट्टीवार(Vijay Vaddettiwar) यांनी केल्यामुळे राज्यातील गोर नायकळ महिला पदाधिकारी यांनी तिर्थक्षेत्र काशी पोहरादेवी येथे एकत्र येत ५ सप्टेंबर ला नंगारा भवन परिसरात विजय वड्डेट्टीवार यांच्या फोटोला महिला पदाधिकारी यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला.
वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा पोहरादेवीत निषेध
नवी मुबंई(Mumbai) येथे संत डॉ रामराव महाराज ट्रस्ट नावाने मिळालेला भूखंड पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी आपल्या नावाने घेऊन ५०० कोटी रुपयाचा भूखंड शासकीय दरात नाममात्र पैशात घेऊन हडपला आहे, असा चुकीचा आरोप वड्डेट्टीवार यांनी ना. संजय राठोड यांच्या वर केल्याने राज्य भरातील गोर नायकळ पदाधिकारी यांनी वड्डेट्टीवर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पोहरादेवी येथील नंगारा भवन परिसरात एकत्र येत गुरुवारी निषेध व्यक्त केला. यावेळी काँग्रेस व वड्डेट्टीवार यांच्या विरोधात घोषणा देवून महिलांनी फोटोला जोडे मारून आंदोलन केले. यावेळी गोर नायकळ च्या महिला प्रदेश अध्यक्षा छाया राठोड, महासचिव लता राठोड, उपाध्यक्ष सीमा राठोड, सुजाता जाधव, उषा राठोड, सुनीता जाधव, छाया राठोड, अनिता पवार, वनिता राठोड, सुरेखा जाधव, रंजना चव्हाण, वैशाली राठोड, बाली राठोड, संगीता जाधव, योगिता राठोड, सीमा चव्हाण, शोभा राठोड, उषा चव्हाण, मीनल चव्हाण, नीता आडे, सुमन जाधव, अर्चना चव्हाण, अनुसया राठोड, कमला राठोड, वनिता राठोड, प्रमिला राठोड, रेणुका राठोड, दुर्गा चव्हाण, इंदू चव्हाण, पुष्पा खत्री, विमल चव्हाण, उषा खत्री आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
बंजारा समाजाच्या नेत्यांना बदनाम करु नये!
नंगारा भवन येथे महिला पदाधिकाऱ्यांनी केलेला निषेधाचा शासन दरबारी नोंद व्हावी व ज्या नेत्याने बंजारा अस्मिता जतन करण्यासाठी पोहरादेवी व उमरीगड चा विकास केला त्या नेत्या विरुद्ध कोणी जाणीव पूर्वक बदनामी करू नये म्हणून महिला निषेध करण्यासाठी एकत्र आल्या होत्या.