नांदेड (Congress Andolan) : केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात (Budget 2024) शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची मदत किंवा अनुदान तसेच कर्जमाफीसाठी तरतूद करण्यात आली नसल्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हणुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Congress Andolan) वतीने धरणे आंदोलन करून महायुती सरकारचा निषेध करण्यात आले. रासायनिक खते, कीटकनाशके,शेती अवजारे, गोरगरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य याबाबीवरील जीएसटी वगळण्यात आली नाही.
उलट शेतीशी निगडित ज्या वस्तु आहेत, त्यात शेती अवजारे, रसायनिक खते यांच्या किमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे उद्योगपतीचे 16 लाख कोटी कर्ज माफ करण्यात आलेले आहेत, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले. (Swaminathan Commission) स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या नाहीत मागील काही वर्षात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कुठलीच ठोस तरतूद करण्यात आली नसल्यामुळे नांदेड जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज धरणे आंदोलन (Congress Andolan) करण्यात आले. या आंदोलनकर्त्याशी दैनिक देशोन्नतीकडून संवाद साधण्यात आला आहे.