काँग्रेस कमिटीची जिल्हास्तरीय बैठक, बबलू देशमुख यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश
अमरावती (Congress Committee) : काँग्रेसचे जे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय आहेत त्यांनाच बुथ कमिट्यांमध्ये स्थान द्या त्यांचीच बी एल ए म्हणून निवड करा तर निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना कमिट्या बाहेर काढा, असे निर्देश जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख (Bablu Deshmukh) यांनी मंगळवारी बैठकीमध्ये दिले.
आगामी निवडणुकांच्या (Congress Election) पार्श्वभुमिवर काँग्रेसच्या वतीने संघटनात्मक बैठकांचा सपाटा सुरू झाले आहे. अशातच (Congress Committee) जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी काँग्रेस भवन येथे जिल्हास्तरीय बैठकी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री आमदार ॲड. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बैठकीला, वीरेंद्र जगताप, सुधाकरराव भारसाकळे, हरिभाऊ मोहोड, बाळासाहेब हिंगणीकर, जयंतराव देशमुख, प्रदीपराव देशमुख, प्रवीण मनोहर, मुकद्दर खाँ पठाण, संजय नागोणे, यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
जिल्ह्यातील बूथ कमिट्या आणि नव्याने नियुक्ती व सक्रिय पदाधिकाऱ्यांना स्थान देण्याकरिता 25 ते 30 जुलै पर्यंत ची वेळ बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली, नंतर विविध संघटनात्मक कार्याचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. या बैठकीला संजय वानखडे (मार्डिकर),रामेश्वर अभ्यंकर, प्रकाशराव काळबांडे, श्रीकांतराव गावंडे,भैय्यासाहेब मेटकर, नंदू यादव, प्रमोद दाळू,दिलीप काळबांडे,भाई देशमुख, राजीक भाई, विनोद पवार, दीपक सवई, राजेंद्र नागपुरे, अमोल होले,पंकज वानखडे,श्रीनिवास सूर्यवंशी,विनोद गुलदे, सतीश हाडोळे, दिवाकर देशमुख, सुनील गावंडे,नामदेव तनपुरे, प्रदीप देशमुख, वि आर.देशमुख, दिनेश वानखडे, राजाभाऊ टवलारकर, देवेंद्र पेटकर, श्रीधर काळे,किशोर देशमुख, सचिदानंद बेलसरे, नरेंद्र हगवणे, राजेश काळे, अबिद खान, झाकीर भाई, विनोद चौधरी, गणेश आरेकर, सिद्धार्थ बोबडे, अमित गावंडे, रमेश काळे, सुनील निचित, विशंभर नीचीत, सुरेश देशमुख, संजय खोडस्कर, सुधाकर तलवारे, आशिक अन्सारी, जहीर बेग, विष्णू राठोड, हिम्मतराव मंदासे, अब्दुल राजिक, शेख मुख्तार भाई, हरेराम मालवीय, विनायकराव गवई, राजाभाऊ उल्ले, संजय कळसकर,विनायक ठाकरे, राजू कुरेकर, ईश्वर बुंदिले, भूषण कोकाटे, पंकज विधळे, संदीप भदाडे, संजय सरोदे शैलेश नाथे, भैय्यासाहेब वानखडे, राजू शहा, प्रदीप देशमुख, अब्दुल कलीम, सलामउद्दीन शेख, संजय सरोदे,उत्कर्ष देशमुख,नितेश वानखडे,नीरज कोकाटे,सागर देशमुख, आदींची उपस्थिती होती.
आगामी निवडणूक (Congress Election) लक्षात ठेवता आता प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन व पक्षासाठी एकजुटीने व एक शक्तीने काम करायचे आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचे आमदार अमरावती जिल्ह्यामध्ये निवडून येथील असे नियोजन गाव पातळीवर करा.
– आमदार यशोमती ठाकूर