अमरावती (Dr. Kota Nilima) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर काँग्रेसच्या लोकसभा निरिक्षक डॉ. कोटा निलिमा (Dr. Kota Nilima) यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीमधील बुथनिहाय आढावा घेतला. बुथ कमिट्या सक्षम करण्याचे निर्देश तालुका अध्यक्षांना देण्यात आले. (Congress Lok Sabha) लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत कोणती तयारी करावी,याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले.
ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्याचे संकेत असल्याने आता सर्वच पक्ष कामाला लागले आहे. अशातच स्थानिक विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीकरीता कंबर कसली असुन नेमकी बुथस्तरावर काय परिस्थिती आहे. बुथ कमिट्या सक्षम आहे का, त्यांची जबाबदारी आदी बाबत चर्चा करण्याकरीता सोमवारी सायंकाळी (Congress Lok Sabha) काँग्रेसच्या लोकसभा निरिक्षक डॉ. कोटा निलिमा (Dr. Kota Nilima) ह्या शहरात दाखल झाल्या. त्यांनी खा. बळवंत वानखडे, माजी मंत्री सुनील देशमुख,जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या उपस्थिती तालुका प्रमुखांकडून बुथनिहाय निवडणुकीबाबत आढावा घेतला.
लोकसभेमध्ये कॉगे्रसला मिळालेल्या यशानंतर विधानसभेत देखील यापेक्षाही चांगली कामगिरी झाली पाहीजे. जागा वाटाघाटीत कोणता मतदार संघ कूणाच्या फायद्याचा आहे. याबाबत देखील माहीती कोटा निलिमा यांनी जाणुन घेतली. यावेळी हरिभाऊ मोहोड,कांचनमालाताई गावंडे, प्रवीण मनोहर, भैया पवार, सुधाकर भारसाकळे, प्रदीप देशमुख, जयंत देशमुख, मुकद्दर खाँ पठाण, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, दयाराम काळे, हरीश मोरे, अरुण वानखडे, रामेश्वर अभ्यंकर, गुणवंत देवपारे, डॉ. हेमंत चीमोटे, महेन्द्र गैलवार, प्रदीप देशमुख, निशांत जाधव, समाधान दहातोंडे, अमोल ढवसे, अक्षय पारसकर, पंकज वानखडे, अमोल होले, बाळासाहेब हिंगनीकर, विठ्ठल सर्डे, प्रमोद दाळू, वीरेंद्र सिंह जाधव, रमेश सावळे, नामदेव तनपुरे, ईश्वर बुंदेले, अतिश शिर्भाते, श्रीकांत झोडपे, किशोर देशमुख, अमित गावंडे, वैभव वानखडे, श्रीधर काळे, पंकज मोरे, दिलीप काळबांडे, विलास बोरेकार, शिवाजी देशमुख, सागर कलाने, गणेश आरेकर, जहीर बेग, श्रीनिवास सूर्यवंशी, प्रदीप शेवतकर, राजेश सेमलकर, सहदेव बेलकार, जहीर, भाई मुख्तार शेख, संजय बेलोकर, प्रदीप देशमुख, अब्दुल कलीम, सलामउद्दीन करीमउद्दीन, जी एम खान, नंदू यादव, विजय विल्हेकर, सदानंद तिडके, हेमंत येवले, विनायक ठाकरे यांची उपस्थिती होती.
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.त्यामुळे आता तालुका व गावस्तरावरील पदाधिकाऱ्यांनी कामाला लागले पाहीजे. जे काम करीत नसतील त्यांनी आपला राजीनामा द्यावा. बुथ कमिट्या देखील सक्रिय कराव्यात अन्यथा नव्याने कमिट्या तयार करा परंतु आता कामाशिवाय पर्याय नाही.
– बबलु देशमुख, जिल्हाध्यक्ष