नांदेड (Badlapur atrocities) : बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील महात्मा फुले पतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आले. आरोपींला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. प्रधानमंत्री बेटी बचाव बेटी पडाव चा नारा देत आहेत. परंतु त्यांच्या (Badlapur Case) सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हे सरकार तयार नाही. त्यामुळे देशातील महिला मुली आज सुरक्षित नाहीत रोज त्यांच्यावर अत्याचर होत आहे. त्यामुळे कायदे कडक करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डाॅ. रेखा पाटील चव्हाण यांनी केली आहे.