वाशिम(Washim):- केंद्र व राज्य शासन शेतकर्यांना नागवण्याचं धोरण अवलंबित असून, दोन्ही शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत २६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कुठल्याही दृष्टीने शेतकर्यांच्या हिताचे नसलेल्या शासन धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.
वाशिममध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन
धरणे आंदोलनादरम्यान तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी (loan waiver)करण्यात यावी, नियमित कर्ज फेडणार्या शेतकर्यांना मंजूर केलेले प्रोत्साहन पर अनुदान द्यावे, नदीजोड प्रकल्पात वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा, अतिवृष्टी व पिक विम्याची रक्कम ई केवायसी न करता शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, सन २०२३ मध्ये अतिवृष्टी झालेल्या पिकांचा व फळबागांचा विमा तात्काळ देण्यात यावा, पी. एम. किसान योजनेचे हप्ते तात्काळ शेतकर्यांच्या खात्यात जमा करावेत, अपंगाचे अनुदान ३००० रुपये करण्यात यावे व ३५ किलो राशन मोफत देण्यात यावे, श्रावण बाळ व संजय गांधी (Sanjay Gandhi)लाभार्थ्यांचे अनुदान ३००० रुपये करण्यात यावे, श्रावण बाळ व संजय गांधी योजनेसाठी उत्पन्न मर्यादा ही २१ हजाराहून दोन लाख रुपये करण्यात यावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले
आंदोलनात काँग्रेस कमिटीचे(Congress Committee) जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक, जिल्हा प्रभारी देवानंद पवार, प्रदेश महासचिव दिलीपराव सरनाईक, प्रदेश सरचिटणीस दिलीप भोजराज, जि. प .उपाध्यक्ष चक्रधर गोटे ,काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष डॉ.श्याम गाभणे ,किसनराव मस्के, जि. प. सभापती वैभव सरनाईक, सलीम परशुवाले, डॉ. दादाराव देशमुख अॅड.पि.पि.अंभोरे, समाधान माने ,नंदाताई गणोदे, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष जावेद परवेज, गजानन गोटे, सोनाली ताई जोगदंड यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले.