विधानसभा निहाय प्रभारी जाहीर, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक
झेडपीवर पुन्हा झेंडा फडकविण्याचे बबलू देशमुख यांच्या आवाहन
अमरावती (ZP Elections) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका (ZP Elections) आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर कंबर कसली आहे. रविवारी काँग्रेस भवन येथे सहा विधानसभा सर्वांची बैठक प्रभारींच्या उपस्थितीत तसेच जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली, या बैठकीला तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विविध महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून खासदार बळवंत वानखडे, नवनियुक्त जिल्हाप्रभारी सिद्धार्थ हत्तीअंबिरे, तसेच प्रदेश सरचिटणीस हरिभाऊ मोहोड यांनी मार्गदर्शन केले, यावेळी संघटनात्मक कामकाजाबरोबरच आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी ठोस रणनिती आखण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर जनतेपर्यंत पोहोचून काँग्रेसची विचारधारा दृढ करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
विशेष म्हणजे जिल्हा काँग्रेसने प्रत्येक (ZP Elections) विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी नियुक्त करून संघटनाला नवे बळ दिले आहे. धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघासाठी अक्षय राऊत (सचिव), तिवसा मतदारसंघासाठी धनंजय देशमुख (बुलढाणा), दर्यापूर मतदारसंघासाठी श्री. प्रशांत पाचडे (सचिव), मेळघाट मतदारसंघासाठी श्रीमती संजीवनी बिऱ्हाडे (अकोला), अचलपूर मतदारसंघासाठी श्री. संजय खाडे (सचिव) तर वरुड-मोर्शी मतदारसंघासाठी जावेद अन्सारी (सचिव) यांची प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती म्हणजे फक्त नावे जाहीर करणे नसून आगामी (ZP Elections) निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळालेली प्रेरणा आहे. प्रत्येक विधानसभा प्रभारी आपल्या मतदारसंघातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून संघटनाला गती देणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणांगणात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी या नियुक्त्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बैठकीला हरिभाऊ मोहोड,सुधाकरराव भारसाकळे, प्रमोदराव दाळु, महेंद्र सिंह गेलवार, किशोरभाऊ देशमुख, नामदेवराव तनपुरे, अमित गावंडे, श्रीनिवास सूर्यवंशी,श्रीकांत जोडपे,श्रीकांत बोंडे,सहदेव बेलकर, अमोल होले, प्रदीप देशमुख,वैभव वानखडे, पंकज वानखडे, भूषण कोकाटे, शेख मुख्तार भाई,प्रदीप मुंदडा,आतिश शिरभाते, पवन बेलसरे, राहुल बोडके आदींची उपस्थिती होती
बॉक्स
आजवर जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचा झेंडा राहिलेला आहे, हीच परंपरा पुढेही कायम राहील, आगामी निवडणुकीसाठी आता प्रत्येकाने सज्ज होणे गरजेचे आहे, काँग्रेसचे विचार घराघरात पोहोचून पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा,
-जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख