अमरावती (Dr. Anil Bonde) : भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत कारवाई करण्याची जोरदार मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. बोंडे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आमदार ॲड. यशोमती ठाकूर (MLA Adv. Yashomati Thakur) , खासदार बळवंत वानखडे , काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, प्रवक्ते मिलींद चिमोटे यांच्यासह (Congress) जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन आयुक्तांना गराडा घालत मागणी केली.
राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून बोंडे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. डॉक्टर अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते यांच्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांसमोर राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे असे विधान केले. हे विधान अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. असे निवेदन करून समाजामध्ये राहुल गांधी यांचे बद्दल द्वेष निर्माण करून त्यांच्यावर लोकमानसातून हल्ला व्हावा याकरिता उद्युक्त करण्यात आले आहे. त्यामुळे देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप ॲड. यशोमती ठाकूर (MLA Adv. Yashomati Thakur) यांनी यावेळी केला.
बोंडे यांनी अशा पद्धतीने उद्युक्त करणारे केलेले हे विधान फौजदारी गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. डॉक्टर बोंडे (Dr. Anil Bonde) हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्यांविरोधात हल्ले व्हावेत, असा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचा तात्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी उपस्थित नेत्यांनी पोलीस आयुक्तांना गराडा घालत केली.
जम्मू काश्मीर आणि हरियाणा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि दंगली भडकवण्याचा बोंडे यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केला. राहुल गांधी हे सार्थक त्याने तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी झटत आहेत काम करत आहेत त्यांच्या प्रश्नांवर बोलत असल्याने केंद्र सरकारला त्यांचे वावडे निर्माण झाले आहे. बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी हे विधान प्रसार माध्यमांसमोर केले आहे तसेच समाज माध्यमांवरही ते व्हायरल होत असल्याने राहुल गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे तातडीने बोंडे यांना अटक करावी अशी मागणी यावेळी ॲड. ठाकूर (MLA Adv. Yashomati Thakur) यांनी केली.
यावेळी आमदार ॲड. यशोमती ठाकूर (MLA Adv. Yashomati Thakur) , खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बबलु शेखावत, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, प्रवक्ते मिलींद चिमोटे, हरीष मोरे, हरीभाऊ मोहोड, भैय्या पवार, प्रविण मनोहर, अमित गावंडे, वैभव देशमुख, शैलेष काळबांडे, जयश्री वानखडे, अंजली ठाकरे, शोभा शिंदे, बंडु हिवसे, राजु बोडखे यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.