परभणी (Parbhani):- चिकनगुणिया(Chikungunya), डेंग्यू (Dengue), मलेरियाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. परभणी शहर महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Department of Health)२६ ऑगस्ट ते २१ ऑक्टोबर या दरम्यान शहरातील १८ हजार ८०२ घरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये ३८ हजार २५६ पाणीसाठे तपासण्यात आले. यात १ हजार ११९ पाणीसाठेदुषित आढळले आहेत.
शहरामध्ये संसर्गजन्य आजारात वाढ होऊ नये यासाठी घरांचे सर्वेक्षण करुन रक्त नमुने घेतल्या जात आहेत. त्याचप्रमाणे इलायजा टेस्टही करण्यात येत आहे. परभणी शहरातील ज्या घरांमध्ये पाणीसाठे दुषित आढळले होते त्यापैकी ४३१ साठ्यांमध्ये डास, अळीनाशक औषधी टाकण्यात आली आहेत.
१८ हजार ८०२ घरांचे संरशीत ताप रुग्णांचे सर्वेक्षण
६८८ पाणीसाठे नष्ट करण्यात आली आहेत. १८ हजार ८०२ घरांचे संरशीत ताप रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामुळे तापीचे ४३२ रुग्ण आढळले आहेत. त्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये एकही रुग्ण डेंग्यू बाधित आढळला नाही. डेंग्यू, चिकनगुणिया, मलेरिया रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये ७८९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात तापीचे ३१४ रुग्ण आढळून आले. २४२ रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात आले. १७ संशयीतांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहे. आरोग्य कर्मचार्यांमार्फत घरोघरी जाऊन डेंग्यू, चिकनगुणिया, मलेरिया आजारांचा पैâलाव होऊ नये म्हणून नागरीकांना समुपदेशन करण्यात येत आहे. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यात येत आहेत. साथरोग तज्ञ (Epidemiologist) यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. डेंग्यू, चिकणगुनिया, मलेरिया या आजारांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पाणीसाठे उघडे ठेऊ नयेत. पाणीसाठे झाकुन ठेवावेत, झोपताना मच्छरदानिचा वापर करावा, कचर्याची योग्य तर्हेने विल्हेवाट लावावी, ताप व इतर लक्षणे आढळून आल्यास मनपाच्या आरोग्य केंद्रात तपासणी करुन उपचार घ्यावेत असे आवाहन महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.