राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लातूर (Constitution Defacement Case) : परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी असलेल्या संविधान प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लातूर जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे शनिवारी करण्यात आली. लातूर जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने परभणी परभणी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील संविधान प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी.
तसेच परभणी पोलीस प्रशासन दलित वस्तीमध्ये जाऊन दलित कार्यकर्त्यांवर (Constitution Defacement Case) कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अटक केली जात आहे. हे कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
या (Constitution Defacement Case) निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संतोष वाघमारे, जिल्हाध्यक्ष रवी कुरील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल कबाडे, गटई कामगार जिल्हाध्यक्ष नंदकुमार बनसोडे, जिल्हा संघटक बालाजी शेरखाने, महिला शहराध्यक्ष सुरेखा घोडके, औसा तालुका कार्याध्यक्ष अनिल कांबळे, गटई कामगार शहराध्यक्ष परमेश्वर कांबळे, दीपक हेळकर, बालाजी जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी, नेताजी राऊत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.