परभणीत पत्रकार परिषदेत विजय वाकोडे यांची मागणी
परभणी (Constitution Desecration Case) : शहरात झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशां मार्फत चौकशी करण्याची मागणी विजय वाकोडे यांनी केली. ते १३ डिसेंबर रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकार परिषदेस भिमराव हत्तीअंबीरे, मिलिंद सावंत, रवि सोनकांबळे, सिध्दार्थ भालेराव यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना विजय वाकोडे म्हणाले की, जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास नाही. (Constitution Desecration Case) पोलीस प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा संशय ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आंदोलन रोखण्यात पोलिस व जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. हे अपयश झाकण्यासाठी पोलिसांकडून आंबेडकरी वस्त्यांना लक्ष्य करुन अल्पवयीन मुली, महिला, तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली.
दंगलीचे आम्ही समर्थन करत नाहीत. दंगल करणारे आंबेडकरी तरुण नव्हते, पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करावेत, मात्र निष्पप तरुणावर गुन्हे दाखल करुन नयेत, अशी मागणी केली. प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले कोम्बींग ऑपरेशन बंद करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी भिमराव हत्तीअंबीरे म्हणाले की, परभणी जिल्हा, महाराष्ट्र शांत झाला पाहिजे. मात्र जाणिवपुर्वक आंबेडकरी चळवळीला बदनाम करुन दडपण्याचे षडयंत्र कुणाचे आहे, याचाही शोध घेतला पाहिजे. सन २०१८ मध्ये भिमा कोरेगाव लढ्याच्या २०० व्या वर्धापन सोहळ्यात दंगल झाली होती.
आता (Constitution Desecration Case) संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने पुन्हा दंगल घडविण्याचे कुणी षडयंत्र करत आहे का ? किंवा राज्यात सुरू असलेला ईव्हीएम विरोधी मोहिमेचा मुद्दा बाजूला सारण्यासाठी परभणीत विटंबना करण्यात आली का ? असाही सवाल उपस्थित करुन हत्तीअंबीरे यांनी परभणीत काल झालेल्या दगडफेकीत व्यापार्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल खेद व्यक्त केला. शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणीही करणार असल्याचे सांगितले.