पुसद (Yawatmal) :- तहसील परिसरातील शासकीय कार्यालयामधील कर्मचाऱ्यांसह विशेष करून महिला कर्मचारी यासह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह महिलांना शौचालयासंदर्भात (toilet) प्लीज सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेकांची कुचुंबना होत असे. प्रशासकीय यंत्रणेने याची दखल घेत तहसील परिसरातील मुद्रांक कार्यालयासमोर सार्वजनिक शौचालय चे बांधकाम सुरू केले होते मात्र ते बांधकाम व ती जागा रद्द झाल्यामुळे सदरील बांधकाम रखडले आहे.
जागा रद्द झाल्यामुळे सदरील बांधकाम रखडले
तहसील परिसरातील ही जागा चुकल्यामुळे अनेकांनी आक्षेप घेतला होता. खरे बघितले तर जुन्या कोर्ट समोरील विनाकारण बांधून ठेवलेल्या जुन्या इमारतीमध्ये सुद्धा शौचालयाचे बांधकाम करता आलं असतं त्यामुळे परिसरातील अतिक्रमणाची डोकेदुखी ही कमी झाली असती मात्र प्रशासकीय यंत्रणेने यासंदर्भात कुठलाही विचार न करता सदरील बांधकाम सुरू केले होते. मात्र संबंधित कंत्राटदाराचे व शासकीय निधी (Government funds) काही प्रमाणात बांधकाम केल्यामुळे तो वाया गेल्याचे दिसत आहे हे विशेष.