परभणी शहरातील वसमत रोडवरील घटना नवा मोंढा पोलिसात गुन्हा!
परभणी (Container Accident) : मालवाहू कंटेनरने दुचाकीला पाठीमागुन दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 18 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास वसमत रोडवर घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात (Nava Mondha Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजनाथ तुरेराव यांनी तक्रार दिली आहे. या अपघातात फिर्यादीचे भाऊ गंगाधर प्रभाकर तुरेराव वय 60 वर्ष, रा. सत्कार कॉलनी यांचा मृत्यू झाला आहे. गंगाधर तुतेराव हे एम.एच. 38 वाय 5237 या दुचाकीने परभणी शहरातून घराकडे येत असताना वसमत रोडवर त्यांच्या दुचाकीला पाठीमागुन एच.आर. 38 ए.जे. 2022 या क्रमांकाच्या कंटेनरने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन गंगाधर तुरेराव यांचा मृत्यू झाला. प्रकरणाचा तपास पोउपनि. भोसले करत आहेत.