साकोळ पंचक्रोशीत ग्रामस्थांचे आरोग्य ‘डेंजर झोन’मध्ये!
शिरूर अनंतपाळ (Victoria agrofood) : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील (Victoria agrofood) व्हिक्टोरिया अॅग्रोफुड प्रोसेसिंग प्रा.लिमिटेडच्या दुषित पाण्याने परिसरातील नागरिक तसेच परिसरातील वाघनाळवाडी, तिपराळ, शेंद, कानेगाव, सय्यदपूर आदी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील नागरिक सध्या विविध आजाराने त्रस्त आहेत. कारखाना निर्मितीला दोन दशके लोटली. तरी सुध्दा शासनाच्या किंवा कारखाना प्रशासनाने कारखान्यांच्या मुलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कारखान्यांपासून निघणाऱ्या केमिकल युक्त पाण्याचे नियोजन कारखान्यांने न करता ते पाणी शासनाच्या आशीर्वादानेच साकोळच्या मुख्य रस्त्यावर सोडले. म्हणजेच साकोळ उदगीर रस्त्यावर तसेच उरलेले दुषित पाणी साकोळवासीयांना कळू न देता साकोळच्या लेंडी नदीत सोडून देण्याचे काम केले आहे. शासनाच्या संबंधित विभागांकडून सदरील (Victoria agrofood) व्हिक्टोरिया अॅग्रोफुड प्रोसेसिंग प्रा.लिमिटेडच्या भोंगळ कारभाराची योग्य चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.
टी.बी., दमा, नाकाचे आजार, घशाचे आजार
व्हिक्टोरिया अॅग्रोफुड प्रोसेसिंग प्रा.लिमिटेडच्या (Victoria agrofood) या केमिकल युक्त पाण्याचा उग्र वास तयार झाला आहे. परिसरातील तिपराळ, शेंद, कानेगाव, सय्यदपूर, वाघनाळ वाडी या गावातील नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. अनेकांना छातीचे विकार, टी.बी., दमा, नाकाचे आजार, घशाचे आजार अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. इतका गंभीर प्रकार राजरोसपणे होत असताना शिरूर अनंतपाळ तालुका प्रशासन काय करते? असा सवाल केला जात आहे.