परभणी/चारठाणा (Parbhani):- येथील ३३ केव्ही उपकेंद्राला येणारी मुख्य लाईनला येलदरी येथुन परभणी पाणी पुरवठा करणारे केंद्र जोडल्याने आणी चारठाणा व परिसरात विद्युत पुरवठा करणार्या लाईनला दरदिवशी काहीना काही समस्या निर्माण होतात. त्यामुळे दररोज रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडित होऊन ४ – ५ तासा पर्यंत विद्युत पुरवठा खंडित आहे. त्यामुळे विद्युत ग्राहक हैराण झाले असुन जिओ कंपनीच्या (Jio Company) टावरला बॅटरीज नसल्याने मोबाईलचे टावर गुल आहेत. याचा नाहक त्रास जिओच्या ग्राहकांना सोसावा लागत आहे.
दररोज रात्री ४ – ५ तासा पर्यंत विद्युत पुरवठा खंडित
३३केव्ही उपकेंद्राच्या अंतर्गत १५-२० गावांसह ईतर उपकेंद्राला विद्युत पुरवठा(Power supply) पुरवल्या जातो.हा विद्युत प्रवाह करणारी मुख्य तारा खुप कुजक्या निकामी झालेल्या असुन यावरच येलदरी येथुन परभणी पाणी पुरवठा केंद्र याच लाईनवर जोडले आहे. त्यामुळे कधी तारामुळे तर कधी जास्त विद्युत दाबामुळे फॉल्ट होतो आणी त्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी काम चालवत आहेत. संदर्भात महावितरण कंपनीचे अधिकारी व लाईनमन यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर याचा मोबाईल फोन नंबर बंद किंवा आऊट ऑफ कव्हरेज येरीया असतो. असे वेळेस कोणाला संपर्क साधावा असा प्रश्न नागरिकांना निर्मान होतो. यामुळेच चारठाणा व परिसरातील सर्व विद्युत ग्राहक हैराण झाले आसुन वारंवर खंडीत होणार्या विद्युत पुरवठ्याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ लक्ष द्यावे. अन्यथा येथील परिसरातील सर्व विद्युत ग्राहक लोकशाही पध्दतीने आंदोलन करणार असल्याचे कळते.